निफाड (जि. नाशिक) : शिवसेना-युवासेना नेते युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज निफाड येथे युवासेनेने आक्रमक होत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी "नितेश राणे भंगार है, वरुण सरदेसाई अंगार है" अशा घोषणा देखील या वेळी देण्यात आल्या. या प्रसंगी निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवासेना ग्रामीण जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, शिवसेना शहरप्रमुख संजयदादा कुंदे, नगरसेविका सुनिताताई कुंदे, अरुणाताई कराड, आरती व्यव्हारे,संजय धारराव,प्रमोद गाजरे,सचिन गिते,तालुका समन्वयक अनिकेत कुटे, शहरप्रमुख युवासेना प्रतीक बाफना, शिवा जेऊघाले,माणिक गायकवाड,स्वराज कुंदे,संदिप कुटे आरिफ मणियार, अभिजित गावले,साजन ढोमसे,रुपेश देसले,सागर सानप,सर्वकंश भोसले,विनित सुरेश मगर, सौरभ ढेंगळे, सौरभ टापसे, चैतन्य रोकडे व शिवसैनिक-युवासैनिक आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू