भाजपच्या अपयशामुळे जळगावला भगवा..! – कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक : भारतीय जनता पक्षाने राज्यात ठिकठिकाणी सत्ता मिळालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोट्यवधींच्या विकासाच्या पॅकेजच्या फक्त घोषणा केल्या; पण प्रत्यक्षात विकासासाठी त्या-त्या शहरांना काहीच दिले नाही. त्यामुळे जळगाव येथील भाजपच्या नाराज नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर विश्वास व्यक्त करीत शिवसेनेला पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

जळगावला भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महापालिकेवर भगवा फडकला. याचे श्रेय महाविकास आघाडीवरील विश्वासाला आहे. स्थानिक पातळीवर पालकमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे यांचे श्रेय आहे. त्यांना मानणारा जळगावला मोठा वर्ग आहे. भाजपने जे विकासाचे स्वप्न दाखविले ते पूर्ण करता आले नाही. त्यामुळेच जळगावला भाजपचा पराभव झाला, असे भुसे यांनी सांगितले. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा