भाजपात परतलेल्या बाळासाहेब सानपांना मिळाले ‘हे’ पद; अखेर चर्चेला पुर्णविराम!  

नाशिक : अलीकडेच भाजपमध्ये परतलेले नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पद काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नाशिक पूर्व मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच सानप यांना सुपूर्द केले. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचा सोडून शिवसेनेत दाखल; पुन्हा भाजपात
नाशिकमध्ये बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव पाहावा लागला होता.  त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर सानपांनी उपयोगिता सिद्ध न होऊ शकल्याने शिवसेना सोडून यामुळे सानपांनी पुन्हा भाजपाची वाट पकडली.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा