भाजप आता कोंबड्या वाटपाचा कार्यक्रम करतोय : संध्या सव्वालाखे

सिडको; पुढारी वृत्तसेवा: ‘शासन आपल्या दारी आणि जनतेला केले दारोदारी’, सर्व वाटून संपल्यानंतर आता काही शिल्लक राहिले नसल्याने भाजप आता कोंबड्या वाटपाचा कार्यक्रम करत आहे, अशी घणाघाती टीका महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी आज (दि. १६) केली. नाशिक जिल्हा काँग्रेसचा भव्य महिला मेळावा सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात पार पडल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सव्वालाखे म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात राज्यातील महिला असुरक्षित आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. खालच्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्या नेत्यांना भाजप पाठिंबा देत आहे. या सरकारचा आणखी एक शपथविधी झाल्यास नवल वाटायला नको.  काँग्रेसचे सरकार असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्या पाठवल्या होत्या. महागाईमुळे आंदोलन केले होते. आता मात्र सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असताना त्या गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना पाटील, शहराध्यक्ष आकाश छाजेड, सिडको विभाग अध्यक्ष विजय पाटील, सुचेता बच्छाव, स्वाती जाधव, चारुताई शिरोडे, शोभाताई बच्छाव,हेमलता पाटील, संगीता तिवारी, सरोज पाटील, कुसुमताई चव्हाण, चारुशीला काळे, अरुणा आहेर, सारिका किर, आशा मोहिते, निर्मला भाटिवले, रेणुका डिसुझा, सुमन महाले, सुमन कैचे, नंदा सहारे, बेबी नंदा खंबाईत, रुख्मिणी गाडर, मनीषा मालुंजकर, सविता पंडित, अरुणा खैरनार, संगीता पगारे, सुमन राऊत, वैशू देशमुख, सुमन महाले, चंद्रभागा जाधव, वैशाली चिंचोले, ललिता जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post भाजप आता कोंबड्या वाटपाचा कार्यक्रम करतोय : संध्या सव्वालाखे appeared first on पुढारी.