
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘घर चलो’ अभियानांतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांत हे अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत येत्या २१ सप्टेंबर रोजी बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावर येत असल्याची माहिती नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे यांनी दिली.
या अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यात तीन कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामांची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० तर लोकसभा मतदारसंघात ६०० कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत. घरोघरी जाऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३० ते ५० हजार नागरिकांची पक्षाच्या ‘सरल अॅप’ मध्ये नोंदणी करून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहिती थेट पोहोचविणे, नवमतदारांची नोंदणी करणे ही कामेही या अभियानात केली जातील, असे पालवे यांनी सांगितले.
हेही वाचा :
- नाशिक : “नमामि गोदा’ प्रकल्पाचा आराखडा आठवडाभरात
- धक्कादायक ! बारामतीमध्ये एकाच रात्रीत चौदा सदनिका फोडल्या
The post भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २१ सप्टेंबरला नाशिकमध्ये appeared first on पुढारी.