भाजप मध्ये खडाखडी! स्वाक्षरीवरून पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून कानउघाडणी 

नाशिक : महापालिकेच्या शहर सुधार समिती व आरोग्य व वैद्यकीय समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत स्वाक्षरी चुकल्याने पक्षाची झालेली बदनामी लक्षात घेता संघटनात्मक पातळीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते. माजी संघटनमंत्री किशोर काळकर व विभागीय संघटक रवी अनासपुरे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत यापुढे अशा प्रकारच्या किरकोळ चुका सहन केल्या जाणार नसल्याचे खडेबोल सुनावले. 

बदनामीच्या धास्तीने भाजपकडून तातडीची बैठक 
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, वैद्यकीय व आरोग्य तसेच शहर सुधार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी गेल्या आठवड्यात निवडणुका झाल्या. महिला व विधी समितीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु शहर सुधार व वैद्यकीय समिती सभापतिपदाच्या निवडणुका मात्र स्वाक्षरीच्या चुकांमुळे स्थगित कराव्या लागल्या. जनमानसात भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष असल्याची प्रतिमा आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

स्वाक्षरीपुराणामुळे गालबोट

या प्रतिमेला स्वाक्षरीपुराणामुळे गालबोट लागल्याने त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. नाशिकसारख्या मोठ्या शहरात अशा चुका होत असतील तर पक्षाला परवडणारे नसल्याने माजी संघटनमंत्री काळकर व संघटनमंत्री अनासपुरे यांनी रविवारी (ता. १३) नाशिकमध्ये तातडीची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकांचे धडे दिले. नगरसेवकांसोबत समन्वय साधणे, कागदपत्रे तपासणे, पक्षाची कार्ये लोकांपर्यंत पोचविणे, अंतर्गत वाद वरिष्ठांच्या कानावर घालून सामंजस्याने तोडगा काढणे आदी प्रकारच्या सूचना देण्यात आल्याचे भाजपमध्ये बोलले जात आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ