भाजप-मनसेचे ‘हम साथ-साथ हैं’, अहमदाबाद सहलीवरून सदस्य परतले 

नाशिक : महापौर निवडणुकीप्रमाणे स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतदेखील दगाफटका होईल, या भीतीने आठ सदस्यांच्या नियुक्तीनंतर अहमदाबाद येथे सहलीसाठी रवाना केलेल्या सदस्यांचे सोमवारी (ता. ८) सायंकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. 

स्थायी समितीमध्ये भाजपचे आठ सदस्य नियुक्त झाल्याने समसमान मते झाली. त्यामुळे भाजपने आठही सदस्यांना २४ फेब्रुवारीला अहमदाबाद येथील गिफ्ट सिटीमधील एका आलिशान हॉटेलमध्ये सदस्यांना ठेवले. मनसेचे सलीम शेखदेखील काही दिवसांनी भाजपच्या गोटात सहभागी झाल्याने बहुमताचा आकडा भाजपने पार केला. पंधरा दिवसांपासून मुक्कामाला असलेल्या रंजना भानसी, हिमगौरी आहेर-आडके, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, माधुरी बोलकर, इंदूबाई नागरे, योगेश हिरे यांच्यासह मनसेचे शेख यांचे विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. निवडणुकीवेळी सर्व सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर