भाजप महामंत्री विजय चौधरी उद्यापासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर

विजय चौधरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे बुधवार (दि. २५) पासून उत्तर महाराष्ट्राचा सहादिवसीय संघटनात्मक दौरा करणार आहेत. ‘महाविजय संकल्प २०२४’ अभियानांतर्गत विस्तारक कार्यशाळा, बूथ सशक्तीकरण अभियान, मेरी माटी मेरा देश, दिवार लेखन, सरल ॲप, संघटनात्मक बांधणी, सामाजिक समरसता, युवा वॉरियर शाखा आदी विषयांच्या अनुषंगाने हा दौरा असणार आहे.

बुधवारी दुपारी १ वाजता नांदगाव-मनमाड विधानसभा सुपर वॉरियर पदाधिकारी बैठक, तर दुपारी ४ ला येवला विधानसभा सुपर वॉरियर पदाधिकारी बैठक घेऊन चौधरी हे शिर्डी येथे मुक्काम करतील. गुरुवारी (दि. २६) शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन तथा जाहीर सभेला ते उपस्थित राहतील.

त्यानंतर शुक्रवारी (दि. २७) जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा प्रवास योजने अंतर्गत चोपडा विधानसभा, यावल-रावेर विधानसभा, भुसावळ विधानसभा सुपर वॉरियर पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेणार आहेत. शनिवारी (दि. २८) मुक्ताईनगर विधानसभा, जामनेर विधानसभा सुपर वॉरियर पदाधिकारी बैठक, रविवार (दि. २९) रोजी नाशिक येथे जनजाती सुरक्षा मंच आयोजित आदिवासी समाजाच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. सोमवारी (दि. ३०) धुळे शहर व ग्रामीण विधानसभा तसेच शिंदखेडा विधानसभा सुपर वॉरीयर बैठकीस मार्गदर्शन करतील. त्यानंतर मंगळवारी (दि. ३१) साक्री विधानसभा सुपर वॉरियर पदाधिकारी कार्यशाळेला उपस्थित राहतील. लोकसभा प्रवास योजने अंतर्गत चौधरी यांचा आतापर्यंत नंदुरबार, नवापूर, शहादा-तळोदा, अक्कलकुवा, शिरपूर, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पारोळा-एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव-पाचोरा, निफाड, सटाणा, मालेगाव मध्य, चांदवड, कळवण, दिडोरी या विधानसभेचा दौरा झाला आहे.

हेही वाचा :

The post भाजप महामंत्री विजय चौधरी उद्यापासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर appeared first on पुढारी.