भाजी विक्रेत्यांकडून मागितली लाच; महापालिकेचे कर्मचारी गजाआड

नाशिक : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने नागरिक हैराण असताना महापालिकेची यंत्रणा मात्र अद्यापही सुधरायला तयार नसल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

भाजी विक्रेत्यांकडून मागितली लाच

रस्त्यावर किरकोळ भाजी विक्रेत्यांच्या पालेभाज्या व जप्त केलेला वजनकाटा परत करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. प्रकाश माधवराव चव्हाण आणि राजेंद्र पुंडलिक निगळ अशी दोघा संशयितांची नावे आहेत. दोघे महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात कार्यरत असून, भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून पाचशे रुपये गोळा करून लाच मागत असल्याचे हे प्रकरण आहे.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

महापालिकेचे कर्मचारी गजाआड

सिडको परिसरातील भाजी बाजारातील विक्रेत्यांकडून पैसे वसुलीच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. अंबड पोलिस ठाण्यासमोर ही कारवाई झाली.  

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा