भावडबारी घाटात विचित्र अपघात! ट्रॅक्टरचे मशीन व ट्रॉली तुटून एकमेकांपासून वेगळे

देवळा (नाशिक) : देवळा - नाशिक रस्त्यावरील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात एक विचित्र अपघात घडला आहे. या घटनेमुळे बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

भावडबारी घाटात विचित्र अपघात
गुरुवारी (ता.२१) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान देवळ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला याच दिशेने येणाऱ्या लाल मातीने भरलेल्या ट्रॅकने (क्र. टीएन - ५२ - एच - ८८९७) पाठीमागून धडक दिली. एसकेडी शाळेजवळ हा अपघात झाला. त्यात ट्रॅक्टरचे मशीन व ट्रॉली तुटून एकमेकांपासून दूर पडले. यात रवींद्र आनंदराव आहेर (वय ४५, रा. देवळा) हे जखमी झाले. त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले. अपघात झाल्यानंतर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

देवळा - नाशिक रस्त्यावरील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी ट्रक व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. सदर जखमीस देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी तातडीने आपल्या वाहनातून देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोच केले. यामुळे वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली.

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा