भावी सरपंचांची वाढली धडधड! सत्ताधारी गटाने ठोठावले न्यायालयाचे दार; निवड लांबणीवर

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) :  निघालेल्या आरक्षणात बदल होतो का, सरपंचपदाचा हातातोंडाशी आलेला घास जातोय का, या विचारांनी भावी सरपंचांच्या मनात घालमेल वाढली आहे. 

स्थगिती मिळाल्याने भावी सरपंचांची वाढली घालमेल 
टीतटीच्या संघर्षात विजय मिळवला. बहुमतही आपल्या गटाचे आले. सरपंचपदाचे आरक्षण आपल्या सोयीचे निघावे म्हणून देव पाण्यात बुडवून बसलेल्यांचा नवस सार्थकी लागला. आता गावचा बॉस आपणच, या थाटात काही जण वावरत होते. पण, दोन दिवसांपूर्वी सरपंच आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही जणांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण तालुक्याच्याच सरपंच, उपसरपंच निवडीला स्थगिती दिली. त्यामुळे नव्याने आरक्षण निघणार का, या विवंचनेत सध्या नवनिर्वाचित सदस्य आहेत. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

सरपंचपदाची निवड लांबणीवर

सरपंचपदाच्या आरक्षणावर आक्षेप घेत करंजगाव (ता. निफाड) येथील सत्ताधारी गटाने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यामुळे निफाड तालुक्यातील सर्वच ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड लांबणीवर पडली आहे.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

इच्छुकांची धडधड वाढली
निफाड तालुक्यात करंजगाव वगळता सर्वच ठिकाणी बहुमत असलेल्या गटाकडे सरपंचपदाचे उमेदवार आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीला सुरवात झाली होती. काही ठिकाणी तर सहलीलादेखील सदस्य गेले. प्रतिस्पर्धी गटाला संपर्क नको म्हणून अनेक सदस्यांचे मोबाईल नॉटरिचेबल करण्यात आले. आता स्थगिती मिळाल्याने इच्छुकांची धडधड वाढली आहे.