भीषण! ट्रकचा अक्षरशः चक्काचूर; चालक केबिनमध्येच तर क्लीनर काच फुटून बाहेर

नाशिक : लोखंडी शीट घेऊन मुंबईकडून इंदूरला भरधाव जात होता. मागील लोखंडी शीटचा दबाव आणि पुढील धडक यामुळे ट्रकचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील गोविंदनगरसमोरील उड्डाणपुलावर झालेल्या प्रकाराने बघ्यांचाच थरकाप उडाला.

उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताने बघ्यांचाच थरकाप

मुंबई-आग्रा महमार्गावरील गोविंदनगरसमोरील उड्डाणपुलावरून पहाटे सहाला वाहनाचा अपघात झाला. याच वेळी ट्रक (एमएच १८, डीजी ७४९१) हा लोखंडी शीट घेऊन मुंबईकडून इंदूरला भरधाव जात होता. ट्रक उड्डाणपुलावर येताच चालकास समोर अपघात झालेला दिसताच चालक करण जमरेने तत्काळ ब्रेक लावत ट्रक थांबविला. परंतु ट्रक भरधाव असल्याने तोही अपघातग्रस्त वाहनांवर जाऊन आदळला. मागील लोखंडी शीटचा दबाव आणि पुढील धडक यामुळे ट्रकचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. त्यात चालक केबिनमध्ये अडकला, तर क्लीनर केबिनमधील वरील भागात झोपलेला असल्याने ट्रकची काच फुटून तो बाहेर फेकला गेला. यावेळी सहा वाहने एकमेकांवर आदळली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांच्याकडे अपुरी साधनसाम्रगी असल्याने शिंगाडा तलाव मुख्यालयास माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्यालयातील हॅजमॅट आपत्कालीन वाहन घेऊन जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लीडिंग फायरमन इकबाल शेख, शिवाजी मातवड, देवीदास चंद्रमोरे, तौसिफ शेख, नंदू व्यवहारे, गणेश गायधनी, तानाजी भास्कर, किशोर पाटील, विजय शिंदे, अनिल गांगुर्डे, राजू हलास, प्रमोद रंगे, सोमनाथ शिंदे, सुनील शिलावट आदींनी अपघातग्रस्त ट्रकचा भाग योग्य पद्धतीने कापून चालकास सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

दीड तासाच्या प्रयत्नानंतर चालक सुखरूप बाहेर

मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील गोविंदनगरसमोरील उड्डाणपुलावर मंगळवारी (ता. २४) पहाटे सहाला भीषण अपघात झाला. अपघातात सहा वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अपघातातील एका ट्रकमध्ये मात्र चालक अडकून पडला होता. अग्निशमन विभागाच्या दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्यास सुखरूप बाहेर काढण्यात आले.