भुजबळ आमचे दैवत, त्यांच्या भानगडीत पडू नका : महादेव जानकर

महादेव जानकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे, त्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भुजबळ यांना धमकी येणे, हे चुकीचे आहे. अशा धमक्या देणे योग्य नाही. भुजबळ आमचे दैवत असल्याचे जानकर म्हणाले.

जनस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या जानकर यांनी शनिवारी (दि. १४) माध्यमांशी संवाद साधला. जानकर म्हणाले,  भुजबळ ओबीसी समाजाचे माइलस्टोन नेते आहेत. त्यांना धमकी दिली तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशाराच जानकर यांनी दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला. तसेच काँग्रेसने आजवर मराठ्यांनाही खेळवत ठेवले. आता भाजपही तेच करत असल्याचे जानकर म्हणाले.

हेही वाचा :

The post भुजबळ आमचे दैवत, त्यांच्या भानगडीत पडू नका : महादेव जानकर appeared first on पुढारी.