भुजबळ नको रे बाबा! लासलगावातील 46 गावांतील पदाधिकाऱ्यांचा विरोध

लासलगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – ओबीसी समाजाच्या नावाखाली स्वार्थी राजकारणी करणारे मंत्री छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घेतल्यास निष्ठावंत पक्षापासून दूर जातील, असा इशारा येवला- लासलगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी दिला. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी भुजबळ हटाव शिवसेना बचाव अशा घोषणा दिल्या.

मंत्री भुजबळांना शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी लासलगाव येथे निफाड तालुक्यातील 46 गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांच्या या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवा सुरासे यांनी प्रास्ताविकात मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील विविध नेत्यांशी जवळीक सुरू केली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाला भावना समजाव्यात याकरिता हा मेळावा आयोजित केला आहे, असे सांगितले. यावेळी विकास रायते, मनीषा वाघ, प्रमोद पाटील, दिलीप चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, हर्षल काळे यांची भाषणे झाली. यावेळी बाळासाहेब जगताप, विकास रायते, उत्तम वाघ, नीरज भट्टड यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: