नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थान परिसरात ड्रोन उडवणाऱ्यास अंबड पोलिसांनी पकडले. पवन राजेश सोनी (२९, रा. नागरेनगर) असे या संशयिताचे नाव आहे. तो छायाचित्रकार असून, लग्नसराईत ड्रोन शूटिंग करताना चुकून फार्म हाउस परिसरात ड्रोन नेल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
फार्म हाउसवरील सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी 7 च्या सुमारास भुजबळ यांच्या निवासस्थान परिसरावर ड्रोनने घिरट्या मारल्या होत्या. नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा होत असून, मराठा आंदोलकांनी या उमेदवारीस विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या निवासस्थानावर ड्रोन फिरल्यानंतर अंबड पोलिसांसह आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही तपासून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित पवनने ड्रोन उडवल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून संशयित पवनची चौकशी करण्यात आली. भुजबळ फार्मजवळील लग्नसोहळ्यात पवन हा ड्रोनने शूटिंग करत होता. त्यावेळी त्याने अधिक उंचीवर ड्रोन उडवल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किरण रौंदळे यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात संशयितास नोटिस बजावणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.
- Nana Patole : अपघात की घातपाताचा प्रयत्न? नाना पटोले म्हणाले…
- Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा ः काँग्रेस
The post भुजबळ फार्म हाउसवर ड्रोन उडवणारा ताब्यात appeared first on पुढारी.