भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच – अमोल मिटकरी

MLA Amol Mitkari

पुढारी ऑनलाईन डेस्क : भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेतेय त्यांना “सावित्री” कळलीच नाही. नथुरामी समर्थकांना आम्ही पुरून उरू. आपल्याला सलाम. आमची माता “सावित्रीच” असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण

गेले काही दिवस माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आपल्या वादग्रस्त विधानावरुन चर्चेत आहेत. त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं विधान केलं होतं. या विधानावरुन संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. या विधानावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं

माझ्या या विधानाचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. “कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली, यासाठी त्यांना विरोध सहन करावा लागला.  छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, अण्णासाहेब कर्वे आदी महापूरूषांची पूजा आपण का  करत नाही. त्या ऐवजी आपण  सरस्वती देवीची पूजा करतो. मला एवढचं म्हणायचं होतं देवीच्या जागी महापुरुषांची पूजा करावी.

छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, अण्णसाहेब कर्वे आदी महापूरूषांची पूजा करत नाही. ते आपले देव आहेत. त्यांची पूजा आपण का नाही. या लोकांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली. यावेळी त्यांना विरोध सहन करावा लागला. अशा परिस्थिती ज्यांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडी केली त्यांची पूजा करायची सोडून आपण सरस्वती देवीची पूजा करतो.

छगन भुजबळांना अटक

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा धमकी दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार चेंबूर येथील व्यापारी ललितकुमार टेकचंदानी  यांनी केली आहे. ललितकुमार टेकचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, त्यांनी छगन भुजबळ यांना त्यांचेच हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या भाषणाचे व्हिडिओ मोबाईलवर पाठवले होते. त्याच्या नंतर ललितकुमार यांना ‘तू भुजबळ साहेबांना संदेश पाठवतो, भुजबळ साहेबांना मेसेज करणं तुला महागात पडेल’, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो, मी दुबईची लोकं लावतो, असे धमकी वजा व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेज आले. असं आपल्या तक्रारीत ललितकुमार टेकचंदानी यांनी म्हंटले आहे.

MLA Amol Mitkari : नथुरामी समर्थकांना आम्ही पुरून उरू

आज सकाळी अमोल मितकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर छगन भुजबळ यांना टॅग करत ट्विट केले आहे की, “भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेतेय त्यांना “सावित्री” कळलीच नाही. नथुरामी समर्थकांना आम्हीं पुरून उरू. आपल्याला सलाम. आमची माता “सवित्रीच”.

हेही वाचलंत का?

 

The post भुजबळ साहेब महात्मा फुलेंचे खरे वारसदार तुम्हीच - अमोल मिटकरी appeared first on पुढारी.