जळगांव: पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात एकीकडे सर्वत्र दसर्याचा उत्साह सुरू असतांना भुसावळ मध्ये मात्र खूनाची घटना घडली आहे. भुसावळ येथे मध्यरात्री माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून करण्यात आला आहे. या खूनानंतर जळगाव जिल्हा हादरला असून, या खुणा मागे नेमकं कोण आहे? तसेच खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस त्यासंदर्भात अधिक तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दसर्याच्या मध्यरात्री शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला.
येथे खूनाची मालिका सुरूच असून पोलीस यंत्रणा कुठेतरी गुन्हेगारांवर वचक लावण्यात अपयशी ठरलेली दिसून येत आहे. या खूनानंतर पोलिसांच्या रात्रीच्या पेट्रोलिंगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस विभागाच्या दृष्टीने भुसावळ शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार भुसावळ हे लाल शाई ने लिहिलेले एक संवेदनशील शहर आहे. मात्र येथील गुन्हेगारी थांबवण्यात पोलीस पूर्णपणे नापास झालेली दिसून येत आहे.
हेही वाचा :
- असाही जीव, ज्याच्यासाठी पाणी म्हणजे विष!
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार २५, २०२३
The post भुसावळात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून appeared first on पुढारी.