
भुसावळ, पुढारी वृत्तसेवा : शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २१) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शेख दानिश (वय १७) आणि अंकुश ठाकूर (वय १७) दोन्ही रा. ३२ खोली खडका रोड भुसावळ असे दोघा मयत तरुणांचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील खडका रोड भागातील काही तरुण सायंकाळी तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. या तरुणांना नदी पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकूण परिसरातील नागरिकांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील तीन जणांना वाचविण्यास यश मिळाले आहे.
मात्र, दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मच्छिमार बांधवांनी या तरुणांना शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील उपचारासाठी त्यास येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये आणले. डॉक्टरांनी शेख दानिश (वय १७) आणि अंकुश ठाकूर (वय १७) दोन्ही रा. ३२ खोली खडका रोड याना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
हेही वाचलंत का?
- भ्रष्टाचारी म्हणून संबोधले त्याच नेत्यांशी केजरीवालांची हातमिळवणी : दिल्लीतील भाजप खासदारांचे टीकास्त्र
- Benefits of Fenugreek : मेथी महिलांसाठी वरदान; ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय
- Benefits of Fenugreek : मेथी महिलांसाठी वरदान; ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय
The post भुसावळ : तापी नदीपात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू appeared first on पुढारी.