भुसावळ नंतर चोपड्यात तीन गावठी पिस्तूल जप्त

जळगांव : दोन दिवसांपूर्वी भुसावळ शहरामध्ये लगत असलेल्या खडका गावाच्या एका धाब्यावरून पाठलाग करून पोलिसांनी तीन पिस्टल जप्त केल्या होत्या. त्यात चोपडा शहर पोलिसांनी तीन पिस्टल, दहा जिवंत काडतूस, मॅक्झिन फोन व रोख रक्कम असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यामध्ये पुन्हा गावठी पिस्तुले विक्रेत्यांचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी भुसावळ येथे बाजारपेठ पोलिसांनी पाठलाग करून एका स्कार्पिओ गाडीतून तीन गावठी पिस्तूल जप्त केल्या होत्या. चोपडा तालुक्याला लागून असलेल्या उमर्टी कडून 16 रोजी सायकळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान चोपड्याकडे एक युवक हत्यार घेऊन येत असल्याची माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, निलेश सोनवणे, संतोष पारधी, शेषराव तोरे, संदीप भोई, मिलिंद सपकाळे, रवींद्र पाटील, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, आत्माराम अहिरे यांना आरोग्याची माहिती देऊन आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.  त्याप्रमाणे उमर्टी कडून चोपड्याकडे येणाऱ्या बस मध्ये संशयित व्यक्ती हनुमान सिंग गंगाराम चौधरी वय 21 लोहवत जि. जोधपूर राजस्थान याला ताब्यात घेतले. असता त्याच्याजवळून एक लाख तीस हजार रुपये किमतीचे गावठी बनविले दोन हजार रुपये किमतीचे एक खाल  मॅगझीन, दहा हजार रुपये किमतीचे दहा जिवंत काडतूस एक मोबाईल फोन तीन हजार तीनशे रुपये रोख असा एकूण एक लाख पन्नास हजार तीनशे रुपये मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहे.

The post भुसावळ नंतर चोपड्यात तीन गावठी पिस्तूल जप्त appeared first on पुढारी.