Site icon

भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

जळगाव : सध्या उन्हाळी सुट्या तसेच लग्नसराईमुळे रेल्वेत मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होत आहे. अशात नविन गाड्या सुरु करण्याऐवजी आता भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस २० मे पासून एक महिना रद्द करण्यात आली आहे. यामुळे भुसावळ विभागातून या गाडीने पुणे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होईल. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भुसावळ विभागातून पुण्याला जाण्यासाठी व येण्यासाठी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला अनेकांची पसंती मिळते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने मनमाडमार्गे धावणारी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (पनवेलमार्गे) ही गाडी दोन्ही बाजूने २० मे ते १९ जूनपर्यंत रद्द केली आहे. गाडी क्रमांक ११०२५/११०२६ भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरी-पुणे-इगतपुरी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. ११०२५ आणि ११०२६ या गाडीचा रेक गाडी क्र.११११९/१११२० भुसावळ-इगतपुरी-भुसावळ मेमू म्हणून चालविण्यात येणार आहे.

असे राहिल वेळापत्रक…
गाडी क्र.११०२५ मेमू भुसावळ येथून रात्री ११.३५ वाजता निघेल आणि इगतपुरीला सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी पोहचेल. नंतर गाडी क्र.११११९ मेमू इगतपुरी येथून सकाळी ९.५५ वाजता निघेल व भुसावळ येथे सायंकाळी पाच वाजून १० मिनिटांनी पोहचेल. गाडी क्र.१११२० मेमू भुसावळ येथून सकाळी सात वाजता निघेल आणि इगतपुरी येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी पोहचेल. नंतर गाडी क्र. ११०२६ इगतपुरी येथून संध्याकाळी पाच वाजून १० मिनिटांनी निघेल व भुसावळला रात्री १० वाजता पोहचणार आहे. इगतपुरीच्या पुढे कल्याण, पनवेल, लोणावळा, पुण्यापर्यंत ही गाडी चालवली जाणार नाही. इगतपुरीत दिवसभर थांबून नियमित परतीच्यावेळी भुसावळकडे प्रवास सुरू होईल. तसेच इगतपुरीपर्यंत धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला नेहमीप्रमाणे बोगी नसतील. त्याऐवजी या गाडीला मेमूचे डबे जोडण्यात येतील.

हेही वाचा :

The post भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस महिनाभर रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय appeared first on पुढारी.

Exit mobile version