भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना…

भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे आपल्याला महत्वाच्या बैठकींना बोलवत नाहीत, चुकीचे पदाधिकारी घेतल्याने शिंदे गटाचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसें यांच्यावर नाराजीचा बॉम्ब फोडला होता.

सुहास कांदे यांच्या या नाराजीवर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. भुजबळ म्हणाले, सुहास कांदे हे कार्यक्षम व निष्ठावंत आमदार आहेत. दादा भुसे यांनी त्यांना विश्वासात घ्यायला हवे. एकवेळ आम्हाला नाही विचारलं तरी चालेल पण त्यांना विचारायलाच हवे असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन विचारले असता आव्हांडावर गुन्हा दाखल करुन सरकारची प्रतिष्ठा वाढली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबतचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यांनी केवळ गर्दीतून त्यांना बाजूला केले आहे. आव्हाडांवरील विनयभंगाची तक्रार चुकीची आहे. बदल्याच्या भावनेने कुणी वागू नये, महाराष्ट्राच्या राजकारणात अशा गोष्टी कधी झाल्या नाही. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे.

शिंदे गटात गेलेल्या आमदरांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाही अशी तक्रार ऐकायला मिळायची. मलाही आताचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संपर्क करुनही भेटत नाही आहेत. भेटण्यासाठी मार्ग सापडत नाही आहे. 85 सालचा मी आमदार तरी माझी भेट होत नाही अशी खंतही भुजबळ यांनी बोलून दाखवली.

The post भुसे-कांदे वादात भुजबळांची एण्ट्री ; म्हणाले, दादा भुसे यांनी सुहास कादेंना... appeared first on पुढारी.