भोंदूबाबाचा रात्रीचा खेळ फसला! उलट सकाळी चमत्कारच घडला; घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिक : शहरातील सारडा सर्कल भागात मध्यरात्री घडला प्रकार. अमावस्येच्या दिवशीच केला भोंदूबाबाने कारनामा. गुरुवारी (ता. 14)  प्रकार दुकानदारांच्या लक्षात आला. मात्र ते येताच भोंदूबाबाचा प्लॅन फसला अन् सकाळी घडला चमत्कारच...वाचा नेमके काय घडले?

ती व्यक्ती सीसीटीव्हीत कैद

बुधवारी (ता. १३) अमावास्येमुळे अज्ञात व्यक्तीने रात्री सर्व दुकानांसमोर तांदूळ, मिरची, राख असे पदार्थ दुकानांवर दैवी उतारा केल्यासारखे फेकले. अंधश्रद्धेमुळे भीती पसरलेल्या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी व्यावसायिकांचे प्रबोधन केल्यानंतर दुकानदारांनी दुकाने उघडली. दुकानासमोर तांदूळ, मिरची, राख टाकणारी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुकानदारांना ही घटना समजताच त्यांच्यात भीतीचे वातावरण होते. त्यातच एका व्यक्तीच्या मुलास उलटी होऊन तो आजारी पडल्याने या तथाकथित करणीची धास्ती वाढली. काहींनी मौलवीकडून उतारा म्हणून ताविज आणले, तर काहींनी दुकाने बंद ठेवली होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, राज्य सरचिटणीस डॉ. टी. आर. गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, प्रा. सुशीलकुमार इंदवे, महेंद्र दातरंगे आदींनी व्यापारी बांधवांची भेट घेतली व अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करत, त्यांच्या मनातील भीती घालविली. 

हेही वाचा > देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल​

सर्वांनी भीती झुगारून दुकाने उघडली. व्यापारी बांधवांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या व न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागावा यावरून भोंदू, मौलवींच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्तीने हे कृत्य केले असल्याचा संशय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यकर्त्यांनी दुकानदारांना घेऊन भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांची भेट घेतली व आपबिती सांगितली. असिफ सय्यद व मुद्दस्सर सय्यद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस ठाण्यात मुद्दस्सर सलीम सय्यद, खान समीर अमान, मिर्झा एजाज जावेद बेग, युनूस गुलाम अब्बास भारमल, सय्यद जाएद समीम, काजी आयाज हीसामोदिन, कासिम अकबरअली ट्रंकवाला आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?