भोसलाचे विद्यार्थी कोरोनाबाधित; वसतिगृहातून घरी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीची सूचना  

नाशिक : भोसला महाविद्यालयाच्या वसतिगृहातील सहा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर ५२ विद्यार्थ्यांची तपासणी करताना कळविले नसल्याने ही बाब गंभीर असल्याचे महापालिकेने पत्र दिले आहे. दरम्यान, वसतिगृहातून घरी गेलेल्या विद्यार्थ्यांचीही कोरोना तपासणी करण्याची सूचना महापालिकेने केली आहे. 

भोसलाचे सहा विद्यार्थी कोरोनाबाधित 
भोसला महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्यापूर्वी सहा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर ५१ विद्यार्थ्यांची तपासणी झाली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोसला महाविद्यालयाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. यू. वाय. कुलकर्णी यांनी दिली. निवासी विद्यार्थ्यांना ‘आरटीपीसीआर’चा रिपोर्ट तपासूनच वसतिगृहात प्रवेश दिला आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले असून, सर्व विद्यार्थ्यांची रोज थर्मल गनद्वारे स्कॅनिंग केले जाते व ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जाते. ही तपासणी झाल्यानंतरच त्याला वसतिगृहाच्या इमारतीत प्रवेश मिळतो.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

वसतिगृहातून घरी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीची सूचना 

प्रकृतीबाबत शंका आल्यास विद्यार्थ्यांना श्री गुरुजी रुग्णालयात रेस्क्यू व्हॅनद्वारे पाठवून तपासणी केली जाते. महाविद्यालयाच्या इमारतीच्या आवारात आवश्यक प्रमाणात सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. विनंती केलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी घोडेस्वारी व जलतरण तलाव प्रशिक्षण तूर्त बंद केले आहे.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना