जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका फेसबुक पेजवर बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. यात नमूद करण्यात आले की, देशमुख हे फेसबुक पेज पाहत असताना आम्ही वारकरी नावाच्या पेजवर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचे दिसून आले. याबाबत अरविंद देशमुख यांनी तक्रार दिल्यानंतर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 499 व 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- आता OTT वर शिव्या, अश्लिल कंटेंट चालणार नाही! काय म्हणाले अनुराग ठाकुर?
- Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण
- मंगळावर जीवसृष्टीला आधारभूत जैविक रेणूंचे भांडार
The post मंत्री गिरीश महाजनांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.