”मंत्र्याला वाचविणारे महाविकास आघाडीचे बहाद्दर सरकार” आणखी काय म्हणाल्या चित्रा वाघ; पाहा VIDEO 

नाशिक : वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पुरावे असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करतं नाही. पोलिसांकडून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होतोय. मंत्र्याला वाचविणारे महाविकास आघाडीचे बहाद्दर सरकार असल्याची उपरोधिक टिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. मृत पूजा चव्हाण हिच्या मोबाईल वर संजय राठोड यांचे ४५ मिस्ड कॉल असल्याचा दावा करताना आरोप खोटे असतील तर पोलिसांनी सिध्द करून दाखवावे असे आव्हान त्यांनी आज दिले. 

आरोप खोटे असतील तर पोलिसांनी सिध्द करून दाखवावे
पुजा चव्हाण मृत्यु प्रकरणी सरकार विरोधात चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिक मध्ये आंदोलन झाले. त्यानंतर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या. अरुण राठोडच्या जबाबात संजय राठोड यांचे नाव आले असून पोलिसांच्या १०० क्रमांकावर देखील कॉल रेकॉर्ड झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोबाईलवर संजय राठोड नाव्याच्या व्यक्तीचे मिस कॉल आहे. मिस कॉल झालेला संजय राठोड कोण? याचे उत्तर पोलिस देत नाही. संजय राठोड यांच्या आवाजाची ऑडीओ क्लिप पोलिस गायब करतं आहे. आम्ही केलेले आरोप खोटे असतील तर पोलिसांनी ते सिध्द करून दाखवावे. महाविकास आघाडी मधील तीन पक्षांच्या सरकार मध्ये कधी एकी दिसली नाही. मात्र आरोपींना वाचविताना मात्र एकी दिसतं आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. ते सत्तेसाठी तडजोड करणारे नाही त्यांनी राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून गुन्हा दाखल करावा अशी मागणी  वाघ यांनी केली.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

पोलिसांकडून खोटे गुन्हे 
मी मुंबई बॅंकेतून कधी कर्ज घेतले नसताना पोलिस तीस लाख कर्जाची माहिती देण्याची विचारणा करतं आहे. पुजा चव्हाण प्रकरणात आवाज उठविल्याने खोटे गुन्हे दाखल करतं आहे. पुजाला न्याय मिळे पर्यंत मी गप्प बसणार नाही. न्यायालयीन लढाई लढेल. पीडितांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाजं उठवतं राहणार असल्याचे सौ. वाघ यांनी म्हणाल्या. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना