मकरसंक्रांतीदरम्यान मतदान असल्याने नेत्यांची चलबिचल! वॉर्डावॉर्डात पॉवरफूल उमेदवाराची शोधमोहीम सुरू

येवला (जि.नाशिक) : राज्यात १५ जानेवारीला ग्रामपंचयात निवडणुकीचे मतदान होत आहे. याकाळात राज्यात सर्वदूर पतंगोत्सवाची धूम असते. शिवाय घरोघरी हा सण साजरा होतो. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी कर दिन असतो आणि हा दिवस अशुभ मानला जातो. मात्र सण व करीच्या दिवशी ग्रामपंचायतीचे मतदान होणार असल्याने तांत्रिक व धार्मिक अडचणीची शक्यता गृहीत धरून पदाधिकारी व नेत्यांची चलबिचल वाढली असून, चिंतेत भर पडली आहे. 

करीच्या दिवशी ग्रामपंचायतीचे मतदान;
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने गावोगावी पॅनलनिर्मितीसह वॉर्डावॉर्डात पॉवरफूल उमेदवाराची शोधमोहीम सुरू आहे. मतदारयाद्याही अंतिम झाल्याने आता निवडणुकीची खलबते वाढली असून, दमदार पॅनलनिर्मितीसाठी पॅनलप्रमुख सरसावले असल्याने ग्रामीण भागात बैठकींचा जोर वाढत आहे. मात्र जोडीलाच उमेदवारांसह पॅनलप्रमुखांना चिंता सतावत आहे, ती निवडणुकीच्या तारखांची. 

पतंगोत्सवामुळे टक्का घटणार? 
येवल्यातच नव्हे, तर राज्यात पतंगोत्सव जोरात साजरा होतो. त्यातही भोगी, मकरसंक्रांत व कर हे तीन दिवस आजही पंचांग शास्त्रानुसार ग्रामीण भागात पाळले जातात. आजही भोगीच्या दिवशी विविध भाज्यांची एकत्रित भाजी केली जाते. मकरसंक्रांतीला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, तर करीचा दिवस अशुभ असल्याने या दिवशी कुठलेही कार्य केले जात नाही. किंबहुना दुकानेही बंद ठेवली जातात. या दिवशी करकर झाली तर ती वर्षभर पुरते असाही समज आहे. त्यामुळे पंचांगदृष्ट्या अनेकांना मतदानाची १५ तारीख गैरसोयीची वाटत आहे. शिवाय पतंगोत्सवात रंगलेले शौकिन मतदानाकडे दुर्लक्ष करू शकतील म्हणून उमेदवारांची धाकधूकही वाढली आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

ग्रामपंचायतीची अशी संपली मुदत... 
-एप्रिल ते जून - १०२ 
-जुलै - ३७ 
-ऑगस्ट - ४५९ 
-सप्टेंबर - २ 
-ऑक्टोबर - १० 
- नोव्हेंबर - १ 
- डिसेंबर - १० 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे. राज्यामध्ये संक्रांतीला पतंग उडविण्याचा मोठा उत्सव असतो. पतंगोत्सव भोगी, संक्रांत आणि कर या तीन दिवसांमध्ये होत असलेल्य सणास महत्त्व असल्याने तारखांचा विचार व्हावा. - नवनाथ लभडे, माजी सरपंच, निमगाव मढ  