Site icon

मकरसंक्रांत 2023 – गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

मकरसंक्रांत सणानिमित्ताने गोदाघाटावरील सांडव्यावरच्या देवीचा साजशृंगार करून देवीमंदिर सुशोभित करण्यात आल्याने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

 

नाशिक : संक्रांत सणानिमित्त एकमेकींना हळदकुंकू लावतांना महिला.

मकरसंक्रातीपासून सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रमास प्रारंभ होतो. यादिवशी काही वस्तू दान म्हणून देतात. त्याला वाण देणे असे म्हटले जाते. त्यानुसार गोदावरी नदी किनारी असलेल्या सांडव्यावरच्या देवीची ओटी भरुन देवीला हळदी कुंकू देऊन त्यानंतर महिलांनी हळदीकुंकूला प्रारंभ केला.

नाशिक: संक्रांती सण व रविवार सुट्टीचा आनंद घेताना नाशिककर.

संक्रातीला एकमेकांना वाण देण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून लग्नानंतरची पाच वर्षे नववधू वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू जशा कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर इ. वाण म्हणून देत असते. मात्र त्यानंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू वाण म्हणून दिल्या जातात.

नाशिक : मकरसंक्रांतीची खरेदी करताना नागरिक. (सर्व छायाचित्रे – रुद्र फोटो )

The post मकरसंक्रांत 2023 - गोदेकिनारी वसलेल्या सांडव्यावरच्या देवीमंदिराचे सुशोभीकरण appeared first on पुढारी.

Exit mobile version