मकरसंक्रातीच्या दिवशी घडली भयंकर घटना; मांजाने चिरला दोघांचा गळा 

नाशिक : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडवितांना नायलॉन मांजा उडवायला बंदी असली तरी, गुरूवारी (ता.१४) अनेक ठिकाणी पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर झाला. त्यात शहरात दोन जण जखमी झाले. तर लहान-मोठ्या अनेक घटना घडल्याच्या तक्रारी होत्या

मांजाने चिरला दोघांचा गळा 

पहिल्या घटनेत रेहमान अली शेख (१८, म्हाडा बिल्डींग जवळ) हा दुपारी दोनच्या सुमारास वडाळा गावात मोटार सायकल वरुन जॉगिंग ट्रककडे जात असताना मांजा त्याच्या गळ्याला लागला. त्यात, त्याच्या माणेला दुखापत झाली. दुसरी घटना सिडको परिसरात घडली. अशाच प्रकारे दुचाकीवरुन जात असलेल्या मांजाने गळा कापला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसात उशिरापर्यत नोंद नव्हती.  

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा