मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येस जगदंबा मातेच्या मंदिरात दिपोत्सव; ११ हजार दिव्यांनी उजळला परिसर, पाहा VIDEO

वणी (जि. नाशिक) : सप्तश्रृंगी मातेचे मुळ रुप असलेल्या येथील जगदंबा मातेचे मंदिर व परीसरात धनुर्मासाची सांगता व भोगी निमित्त शिवशक्ती मित्र मंडळ शिर्डी (साकुरी शिव) व श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ यांनी सुमारे ११ हजार दिव्यांची आरास करुन नेत्रदीपक असा दिपोत्सव साजरा केला.

 

यंदा पदयात्रेचे २२ वर्ष..

शिर्डी (साकुरी शिव) येथून श्री शिवशक्ती मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी मंडळाचे प्रमुख अंबादास आसणे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तश्रृंगी गड साईनाथांची पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा पदयात्रेचे २२ वर्ष असून दरवर्षी मकर संक्रातीला पदयात्रेकरु सप्तश्रृंगी गडावर आदिमाये चरणी नतमस्तक होतात. सुरुवातीला ७ पदयात्रेकरुनी सुरु झालेल्या पदयात्रेत दरवर्षी वाढ होत असून या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत सव्वाशे भाविक पदयात्रेत सहभागी झाले होते.  गेल्या १२ वर्षांपासून येथील जगदंबा माता मंदिरात संस्थानच्या सहकार्याने भोगी व मकरसंक्रातीच्या पूर्वसंध्येस दिपोत्सव साजरा केला जातो.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

परिसर नेत्रदिपक दिपोत्सवाने उजळुन निघाला

बुधवार, ता. १३  रोजी मंडळाच्या सदस्यांनी सांयकाळी सात वाजता शिस्तबद्द नियोजन करीत पणत्या प्रज्वतील करण्यास सुरुवात केली. साडे सातवाजता जगदंबा देवीची आरती सुरु होई पर्यंत मंदीर परीसरात ११ हजार दिवे प्रज्वलीत करुन आदिमायेची सांज आरती करण्यात आली. यावेळी जगदंबा मंदिर व परीसर र व परिसर नेत्रदिपक दिपोत्सवाने उजळुन निघाला होता. दिपोत्सव बघण्यासाठी वणीकरांनी मोठी गर्दी झाली होती. दिपोत्सवानंतर दत्ता महाराज वैद्य, निफाडकर यांचे समाजप्रबोधनात्मक संगितमय किर्तन झाले. शिर्डी येथून १० जानेवारीला निघालेला साईबाबांचा रथ व पालखी उद्या, ता. १४ मकर संक्रांतीच्या दिवशी वणी गडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल होणार आहे. दीपोत्सव यशस्वीतेसाठी शिवशक्ती मंडाळाचे सदस्य, सप्तशृंगी देवी न्यासाचे कार्यकारी मंडळाने परीश्रम घेतले.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा