मध्यरात्रीचा ‘तो’ खेळ संपला! पोलीसी खाक्या दाखविताच टोळीचा पर्दाफाश

नाशिक रोड : ‘एन्ट्री निकाल’, असे म्हणत ट्रकचालकाला मारहाण केली व राजूच्या खिशातून सहाशे रुपये काढून घेतले. अशा घटना वारंवार घडत असतानाच पोलीसांनी या लुटारूंचा पर्दाफाश केला आहे.

‘एन्ट्री निकाल’, म्हणत ट्रकचालकाला मारहाण
सिन्नर एमआयडीसीमधून चालक सिराजऊद्दीन अलीहुसेन खान रविवारी (ता. ३१) रात्री दीडच्या सुमारास सहकारी राजूसह ट्रकने (एमएच ४८, बीएम ३३०) काच बनविण्याचे कच्चे साहित्य घेऊन आगरटाकळी गावातून गोदावरी पुलावरून जात होते. दोन जणांनी दगडांचा धाक दाखवून ट्रक थांबविला. ‘एन्ट्री निकाल’, असे म्हणत ट्रकचालकाला मारहाण केली व राजूच्या खिशातून सहाशे रुपये काढून घेतले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली

पोलिस नाईक समीरचंद्र मोरे यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शोध पथकाने आगरटाकळी येथील समतानगरमधून राहुल शांताराम जावरे (वय २२) व कुणाल पांडुरंग बिरार (१९) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अटक करून सहाशे रुपये जप्त केले.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

एन्ट्रीच्या नावाखाली मारहाण

ट्रकचालकाला रविवारी मध्यरात्री लुटणाऱ्या दोन युवकांना उपनगर पोलिसांनी काही तासातच अटक केली. सिन्नर एमआयडीसीमधून काच बनविण्याचे कच्चे साहित्य घेऊन ट्रक बलसाडला जात होता. आगरटाकळीजवळील गोदावरी पुलाजवळ दगडांचा धाक दाखवून एन्ट्रीच्या नावाखाली मारहाण करत चालकाला लुटले होते.