मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

सिडको (नाशिक) : येथील पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हात साफ करत पाच लाखांची रक्कम लांबविली.  ही चोरीची घटना पंपावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून. या चोरीच्या प्रकरणात विश्वास घोरपडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सिडको येथे त्रिमुर्ती चौक जवळील दत्त मंदिर चौकात विशाल पेट्रोल पंप आहे. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पंपावर असेलेल्या कार्यालयाच्या कॅबीमधील लॉकरमध्ये असलेले पाच लाख रुपये लांबविले. मात्र पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीची ही घटना कैद झाली आहे. 

अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

या व्हिडीओ फूटेजमध्ये अंगावर पांघरुण घेतलेला चोर हा चोरी केल्यानंतर निघून जाताना दिसत आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलिसांनी सांगितले की विश्वास घोरपडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून  त्यांनी सांगितले की, त्रिमुर्ती चौक जवळील दत्त मंदिर चौकात विशाल पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंप कार्यालयात कॅबीन आहे.अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री कॅबीन मध्ये प्रवेश केला व कॅबीन मधील लॉकर मध्ये असलेले पाच लाख रुपये चोरुन नेले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे