जळगाव : मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करीत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत २१,७४९ गुन्हे नोंदवून २१,७३६ व्यक्तिंना अटक केली आणि २ कोटी ७२ लाखाचा दंड वसूल केला.
मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करण्याच्या बेकायदेशीर क्रियाकलापांविरुद्ध मोहीम राबवून आणि ट्रेनमध्ये तपासणी करुन भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २१,७४९ गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये २१,७३६ व्यक्तींना अटक केली आहे. त्याच्यांकडून २ कोटी ७२ लाख दंड वसूल केला. एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे.
हॉकर्सचा उपद्रव आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी कारवाई दरम्यान, एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ एकट्या भुसावळ विभागाने सर्वाधिक १ कोटी १५ लाखाचा दंड वसूल केला. या विभागामध्ये ६,३४९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून ६,३४८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई विभागात ८,६२९ गुन्ह्यांची नोंद झाली असून ८,६२४ व्यक्तींना अटक करून एकूण ९४ लाख ७७ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. नागपूर विभागात २,७३४ गुन्हे दाखल करून २,७३१ व्यक्तींना अटक, रु.२७.६१ लाखचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने १,८५६ गुन्हे नोंदवले, १,८५५ व्यक्तिंना अटक केली आणि १२ लाख ७१ हजार दंड वसूल केला.
रेल्वे संरक्षण दलाने सोलापूर विभागात २,१८१ गुन्हे नोंदवले, २,१७८ व्यक्तींना अटक केली आणि २१ लाख ९२ हजारचा दंड वसूल केला.
The post मध्य रेल्वेतील फेरीवाल्यांकडून २ कोटी 72 लाखांचा दंड वसूल appeared first on पुढारी.