मनपा आरोग्य विभागातील ६८ पदे भरण्यास मान्यता; पदभरतीस मंजुरी मिळाल्याने समाधान

मालेगाव (जि.नाशिक) : महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा कमी असावा ही अट शिथिल करून राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आस्थापना खर्च ४२ टक्क्यांपेक्षा अधिक असताना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला आरोग्य विभागातील कायमस्वरूपी रिक्त ६८ पदे भरण्यास मान्यता दिली. राज्य शासनाचे उपसचिव एस. टी. जाधव यांनी १६ मार्चला या संदर्भातील मंजुरीचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. 

६८ पदे भरण्यास मान्यता 
महापालिकेच्या विविध रुग्णालयांत व नव्याने झालेल्या जाफरनगर येथील प्रस्तावित रुग्णालयासह १८० पदे रिक्त होती. आरोग्य विभागास एकूण ३०३ पदांपैकी १२३ पदे भदे भरलेली होती. १८० रिक्त पदांपैकी ६८ पदे कायमस्वरूपी भरली जाणार असल्याने आरोग्य विभाग व महापालिका रुग्णालय सक्षम होऊन नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे. महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. यासाठी आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख आदींनी परिश्रम घेतले. कोरोना संसर्गानंतर आरोग्य विभागाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने राज्याच्या वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने नवीन पदभरती करू नये, असे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पदभरतीस मंजुरी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

मंजूर झालेली पदे अशी : 
वैद्यकीय आरोग्याधिकारी- १ 
वैद्यकशास्त्रतज्ज्ञ- २ 
भूलतज्ज्ञ- १ 
बालरोगतज्ज्ञ- २ 
स्त्रीरोगतज्ज्ञ- २ 
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) - २० 
क्षयरोग अधिकारी - १ 
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) - २ 
सिस्टर इन्चार्ज - १ 
परिचारिका - १ 
रक्तपेढी तंत्रज्ञ - १ 
स्टाफ नर्स - १३ 
मिश्रक/औषध निर्माता - ५ 
ऑक्झलरी नर्स - ६ 
प्रयोगशाळा / रक्तपेढी सहाय्यक - १ 
शस्त्रक्रियागृह सहाय्यक - २ 
रुग्णवाहिका चालक -३ 
रुग्णवाहिका क्लिनर - ४ 
---------------------------- 
एकूण - ६८  

 

हेही वाचा  - नाशिकमध्ये कोरोनाचा युरोपियन स्ट्रेन आढळला