मनपा हद्दीलगतच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद! शिक्षण विभागाचा आदेश 

नाशिक : शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता नाशिक महापालिका हद्दीलगत असलेल्या १५ किलोमीटर आतील परंतु ग्रामीण क्षेत्रात येणाऱ्या शाळा देखील १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शाळा व्यावस्थापनास शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशानुसार नाशिक तालुका, सिन्नर, निफाड, दिंडोरी येथील ९८ शाळा बंद करण्यात आल्या असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांनी दिली. 

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा प्रादुभार्व कमी झाल्यानंतर शैक्षणिक वर्ग सुरू करण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे सर्व वर्ग आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबवून सुरू करण्यात आल्या. मात्र फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होवू लागल्याने महापालिका हद्दीत येत असलेल्या सर्व मनपा, खासगी शाळांमधील पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग पुन्हा १५ मार्च २०२१ पर्यंत बंद करण्यात आले आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

शहरातील शाळा बंद करण्यात आल्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा तितका प्रादुभार्व जास्त नसल्याने ग्रामीण जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्ग सुरू असतानाच शालेय शिक्षण विभागाकडून महापालिका हद्दीलगत असलेल्या १५ किलोमीटर परिसरातील सर्व जिल्हा परिषद, खासगी शाळा देखील आता १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शाळांना देण्यात आलेले आहे. 

बंद करण्यात आलेल्या शाळांची संख्या 
तालुका शाळा 
नाशिक ६५ 
दिंडोरी १७ 
सिन्नर १२ 
निफाड ०४ 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा