मनातल्या ‘त्या’ विचित्र भितीने तो बिथरला; दुर्दैवी निर्णय घेतना न आई आठवली, न बहिण 

चिचोंडी(जि.नाशिक) : स्वप्नील नेहमीच भरती प्रक्रियेत सहभागी होत असायचा. पण मनात असलेल्या विचित्र भितीने तो पूर्णत: खचून गेला होता. अशावेळी त्याने असा टोकाचा निर्णय घेतला ज्या वेळी त्याला न त्याची आई आठवली. ना बहिण...काय घडले नेमके?

दुर्दैवी निर्णय घेतना न आई आठवली, न बहिण

स्वप्नील माधव मढवई (वय २४) याने शुक्रवारी (ता. २६) सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे दूध डेअरीला जाऊन घरी आल्यानंतर त्याने आईला घास कापायला शेतात पाठवले. त्यानंतर त्याने घरात जे काही केले. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला, तो गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यासाठी त्याची नगर येथे ट्रीटमेंट सुरू होती. तो भरती प्रक्रियेत सहभागी होत असायचा. मात्र, आपण बरे होणार नाही अशी भीती त्याच्या मनात असल्याने केवळ नैराश्यातून त्याने सकाळी साडेआठच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

त्याच्या पश्‍चात आई व विवाहित बहीण आहे. येवला शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक राऊत तपास करत आहेत.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना