
ओझर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजास आरक्षण मिळावे या करता मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील अनेक छोट्या- मोठ्या गावांमध्ये मराठा समाज बांधव मोर्चा, आंदोलने, उपोषण करत आहेत. (Maratha Reservation)
या आंदोलनात (Maratha Reservation) सहभागी होत निफाड तालुक्यातील दिक्षी गावातील नागरिकांनी एकत्र येत संध्याकाळी कँडल मार्च काढत शासनाचा निषेध केला. यावेळी ‘जय जिजाऊ जय शिवराय, तसेच ‘एक मराठा लाख मराठा’ व ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी दिक्षी गाव दुमदुमून गेले होते. याप्रसंगी दिक्षी गावातील तरुण सहकारी, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच शासन मराठा आरक्षणाबाबत दिरंगाई करत आहे. न्यायालयीन पुर्तता करत नाही, मराठा सामाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहे. असा आरोप यावेळी नागरिकांनी केला.
हेही वाचा
- बडे अधिकारी, खासदार, आमदारांसाठी सिडको उभारणार आता आलिशान टॉवर
- सातारा : राजधानीत भगवे वादळ; जिल्हा थबकला
The post मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ दिक्षी येथे कँडल मार्च appeared first on पुढारी.