मन सुन्न करणारी घटना! थोडीशी निष्काळजी अन् पाच मित्रांचा दुर्देवी अंत; घटनेने कुटुंबियांचा आक्रोश

जुने नाशिक : पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं घरदार मागे सोडून आलेल्या या युवकांचे शहरात कोणी ओळखीच देखील नव्हतं. केवळ त्यांच्यासह रोजगारासाठी आलेले गावातील मित्रच येथे होते.. मुज्जफरपूरहून येथे आलेले रोजगारनिमित्ताने एका खोलीत वास्तव्यास अललेल्या या सात मित्रांसाठी ती रात्र जणू काळ रात्रच बनून आली होती... वाचा नेमके काय घडले..

भारतनगर भागात गेल्या सोमवारी (ता. ३०) रात्रीच्या सुमारास सिलिंडरला गळती लागून घरात सर्वत्र गॅस पसरला होता. मंगळवारी (ता. १) सकाळी त्यातील एका मित्राने पंख्याचे बटण बंद करताच स्पार्किंगमुळे गॅसचा भडका होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात सातही जण गंभीररीत्या भाजले होते. त्यानंतर त्यांच्यापैकी एकास कुटुंबीयांनी गावी नेले, तर अन्य चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

वाहनांचे पंक्चर काढण्याचे काम 

गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झालेल्या स्फोटात गंभीररीत्या भाजलेल्या पाच जणांचा शनिवारी (ता. ५) मृत्यू झाला आहे. यातील चौघांवर येथील जिल्हा रुग्णालयात, तर एकावर मुज्जफरपूर (बिहार) येथे उपचार सुरू होते. हे पाचही युवक व त्यांचे अन्य सहकारी रोजगार मिळविण्यासाठी मुज्जफरपूरहून येथे आलेले होते. शहराच्या विविध भागात वाहनांचे पंक्चर काढण्याचे काम करून भारतनगरमध्ये एका खोलीत सातही जण राहात होते.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

ते गावी पोचलेले नव्हते...

शुक्रवारी (ता. ४) रात्री या पाचही जणांचा मृत्यू झाला. रशीद अन्सारी, निसार अन्सारी, अहमजदअली अन्सारी, मुर्तुजा अन्सारी यांचा येथील जिल्हा रुग्णालयात, तर शोएब अन्सारी याचा मुज्जफरपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. पाच युवकांच्या मृत्यूमुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. 
जिल्हा रुग्णालयातील चौघांचे मृतदेह व गंभीर जखमी असलेल्या अफताब अन्सारी आणि कुतबुद्दीन अन्सारी यांना, शहरातील अन्य भागात राहणाऱ्या त्यांच्या मित्रांनी दोन रुग्णवाहिकांद्वारे त्यांच्या मूळ गावी नेले. शनिवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत ते गावी पोचलेले नव्हते. मात्र, वाटेतच त्यांना मूळ गावी उपचार घेत असलेल्या शोएबचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. 

एकाच दिवशी पाच मित्रांचा मृत्यू 

दरम्यान, हे सर्व मित्र लॉकडाउनच्या काळात गावी गेले होते. तेथून घटनेच्या एक आठवड्यापूर्वीच शहरात परतले होते. रोजगारासाठी एकाच दिवशीच सर्व मित्र शहरात आले. एकाच ठिकाणी राहू लागले. स्फोटाच्या एकाच घटनेत भाजून जखमी झाले आणि त्यातील पाच जणांचा मृत्यूही एकाच दिवशी झाला. त्यामुळे त्यांच्या अन्य मित्रांसह भारतनगर परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच
 

पैस संकलित करून अखेरचा प्रवास 

या युवकांचे शहरात कुणीही नातेवाईक नाहीत. केवळ त्यांच्यासह रोजगारासाठी आलेले गावातील मित्र येथे होते. स्फोट झाल्यापासून हे मित्रच त्यांची देखभाल करत होते. मृत्यूनंतरही त्यांना मूळगावी घेऊन जण्यासाठी या मित्रांनी, तसेच त्र्यंबक सिग्नल परिसरातील हजरत तुरबअली शहा बाबा दर्गाचे विश्‍वस्त आणि भाविकांनी पैसे संकलित केले. त्यातून भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेत त्यांना मूळ गावी रवाना करण्यात आले.