मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपतर्फे राजकारण चाललेय 

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पडद्याआडून भारतीय जनता पक्षाचे राजकारण सुरू आहे, असा हल्लाबोल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ११) येथे केला. तसेच ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कुणाचाही नामोल्लेख न करता त्यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करणारे खासदार भाजपचे असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांशी ते बोलत होते. 

छगन भुजबळ : ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष राहणार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, असे एक खासदार म्हणताहेत. त्यांचा अभ्यास काय, असा प्रश्‍न उपस्थित करून श्री. भुजबळ म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको ही मागणी आजही कायम आहे. मात्र काही लोकांचे ओबीसी आरक्षण काढण्यासाठी प्रयत्न चाललेत. त्यामुळे ओबीसींचे आंदोलन मराठा मोर्चांना उत्तर देण्यासाठी नव्हे, तर आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आहे. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

सरकार सबुरीने घेत आहे
गेल्या तीन ते चार वर्षांपासून भरती सुरू झाली की ती थांबते. मुळातच, ओबीसींमध्ये बराच समाज कुणबी असून, त्यातून नोकरी मिळेल. मात्र मला नोकरी नाही म्हणून इतरांना घेऊ देणार नाही हा प्रकार काय आहे? दुसरीकडे आमच्यावर मराठा आरक्षणविरोधी म्हणून आरोप होत आहेत. शरद पवार यांच्याविषयी गैरसमज पसरवले जाताहेत, असे सांगून श्री. भुजबळ यांनी राज्यातील वातावरण बिघडू नये म्हणून सरकार सबुरीने घेत आहे, असे स्पष्ट केले.  

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण