”मराठा आरक्षणासाठी समाधी घेणार” ; देवळ्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा निर्णय

देवळा; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने तात्काळ सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा स्वत:ला बुजून घेऊन समाधी घेण्याचा निर्णय तालुक्यातील दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी घेतला आहे. याबाबत दहीवडकर यांनी सोशल मीडियावर समाधी घेणार असल्याचा संदेश व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जारांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असून, त्यांच्या पाठींब्यासाठी राज्यभरातून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी साखळी उपोषण, पुढाऱ्यांना गाव बंदी सारखे निर्णय घेतले जात असून,राज्य सरकारकडून अद्याप यावर निर्णय घेतला जात नसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटला असून, देवळा तालुक्यातील दहिवड येथील संजय दहिवडकर यांनी सकल मराठा समाज बांधव, बारा बलुतेदार, अठरा पगड जाती धर्मातील नागरिकांना सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा जवळ स्वतः ला अर्ध बुजवून समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

The post ''मराठा आरक्षणासाठी समाधी घेणार'' ; देवळ्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा निर्णय appeared first on पुढारी.