“मराठी साहित्य संमेलनस्थळाला ‘स्वा.वीर सावरकर नगरी’ नाव द्या” सावरकरांच्या जन्मभूमीत जाहीर निषेध

नाशिक :  ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्य संदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्याच्या मागणीला टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहातर्फे याचा भगूर येथे जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

सावरकर समुहातर्फे भगूर येथे जाहीर निषेध

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी नाशिक असल्याने व ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्य संदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केलेली होती. मात्र नाव देण्याबाबतची संपूर्ण भूमिका निवेदनात विशद करण्यात आलेली असतानाही संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणे टाळले त्यामुळे भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने आज भगूर मध्ये जाहीर निषेध नोंदवला,

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

सर्वांचेच कार्य हे असामान्यच

मात्र यामध्ये काहीजण बुद्धिभेद करून यांचा कुसुमाग्रज यांच्या नावाला विरोध असल्याचे भासवत आहेत. वस्तुतः सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, गोविंदाग्रज, रामदास स्वामी या सर्वांचेच कार्य हे असामान्यच आहे. त्यामुळे मराठी माणूस म्हणून असा विरोध असण्याचे काही एक कारण नाही मात्र ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय केला जातो त्यांच्या नावाला विरोध केला जातो या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे म्हणून हा निषेध नोंदविण्यात आलेला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी १९६६ साली स्वातंत्र्यवीरांनी आपल्या अंतिम समयी आपले कार्य समाप्त झाले म्हणून प्रायोप्रवेशन सुरू केले होते म्हणूनच आज त्यांच्या जन्मभूमी भगूर येथे साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहातर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच