“मलाही नुसत्या आरोपामुळे द्यावा लागला होता राजीनामा!” वाझे प्रकरणी भुजबळांचे मत 

नाशिक : कुणावर आरोप झाले म्हणजे लगेच दोषी मानने गैर आहे. अब्दुल करीम तेलगीच्या गैरव्यवहार प्रकरणात मलाही नुसत्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला होता असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकला कोरोना आढावा बैठकीनंतर ते सचिन वाझे प्रकरणावर बोलत होते. 

भुजबळ म्हणाले की, निलंबित सचीन वाझे यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला धक्का बिक्का काही नाही. वाझेच काय यात चौकशीत दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांनी तसे स्पष्ट केले आहे. मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन पोलिस आधिकाऱ्यांवर आरोप झाले. त्यांच्यावर कारवाया झाल्या मात्र जेव्हा हा प्रकार सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा मात्र ते आधिकारी निर्दोष ठरले याची आठवण करुन देत, मला राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळेच नुसते आरोप झाले म्हणजे कुणाला दोषी मानने गैर आहे. सचीन वाझे प्रकरणात चौकशी होईल. त्यात, काय सत्य काय असत्य ते बाहेर येईल. त्यामुळे याविषयी बोलणे योग्य नाही त्यांनी असेही स्पष्ट केले.  

 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना