मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ

छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील www.pudhari.news

 नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथील सभेत छगन भुजबळ यांना आज चांगलेच टार्गेट केले. त्यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भुजबळ म्हणाले, मला मराठ्यांनी मोठं केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहे. मात्र मीही अनेक मराठा नेत्यांसोबत काम करत होतो. पवार साहेबांसोबत माझेही मराठा बांधवासांठी काहीतरी योगदान आहे. खरंतर शिवसेना आणि बाळासाहेबांनी मला मोठं केल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.( Chhagan Bhujbal )

मराठा समाजात फूट पाडली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली येथील सभेत केला. त्यावर मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही, माझ्यामुळे त्यांच्यात फूट पडणार नाही असेही भुजबळ म्हणाले. जरांगे काय बोलतात ती त्यांची वैयक्तिक संस्कृती आहे, ती मराठा समाजाची नाही. त्यामुळे अनेक लोक माझ्या मागे लागले आहेत, एक अजून लागला तर काही फरक पडत नसल्याचे भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या नाशिक येथील निवास्थानाबाहेरील सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहे. अनेक कॉल येत आहे. माझ्यावर शिव्यांचा वर्षाव होत आहे. माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहे. मात्र मी अशा धमक्यांना घाबरत नाही, माझ्यावर अनेक हल्ले झाले. 91 मध्ये शिवसेना सोडली ती ओबीसी प्रश्नावर सोडली होती. मी ओबीसीचा प्रचार प्रसार केला. मात्र आज मला मराठ्यांनी मोठं केलं असे सांगितले जात आहे. मात्र मला शिवसेना व बाळासाहेबांनी मोठ केल्याचे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा :

The post मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.