Site icon

मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर- ताल-नृत्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पवार तबला अकादमी, आदिताल तबला अकादमी, नृत्यानंद कथक नृत्य संस्था आणि सृजननाद इंडियन क्लासिकल आर्ट्स यांचे शिष्य मलेशिया येथे रंगणाऱ्या स्वर-ताल-नृत्य या ‘अनुभूती’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रविवार दि. २८ मे ते ४ जूनदरम्यान होणाऱ्या या संगीत दौऱ्यामध्ये सर्व कलाकार कला सादर करणार आहेत. मलेशियातील सेलांगोर येथील रामकृष्ण मिशन, क्वालालंपूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर तसेच टेम्पल ऑफ फाइन आर्ट्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमात गायक डॉ. अविराज तायडे व पंडित मकरंद हिंगणे गायन सादर करणार आहेत. तबला वादक नितीन पवार व त्यांचे शिष्य विराज मोडक, अथर्व शाळीग्राम व तबला वादक नितीन वारे यांचे शिष्य अंकुश रहाळकर तबला वादन करणार करणार आहेत. कथक नृत्यांगना कीर्ती शुक्ल यांच्या विद्यार्थिनी गार्गी पाटील, रुद्रा वालझाडे, मैत्रेयी गायधनी, देवश्री पाटील, अर्चना टोळ कथक नृत्य सादर करणार आहेत. भरतनाट्यम नृत्यांगना शिल्पा देशमुख त्यांच्या शिष्या मुक्ता कुलकर्णी, इरा कुलकर्णी, रितिका जगताप, ऋचा देवरे, गायत्री हंडी या भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत. या सर्व कार्यक्रमाला मलेशियातील सुरसंगीत अकादमी सहयोग करत आहे. सर्व विद्यार्थ्यांना नितीन पवार, नितीन वारे, कीर्ती शुक्ल, शिल्पा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा:

The post मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर- ताल-नृत्य appeared first on पुढारी.

Exit mobile version