मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलच्या इच्छुकांनी मंगळवारी (दि. 9) उमेदवारी अर्ज दाखल केले. एका इच्छुकाने अनेक पदांसाठी अर्ज भरल्याने उमेदवारांसाठी रस्सीखेच होणार आहे. परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी ठाकरे बंगल्यापासून रॅली काढत निवडणूक मंडळ कार्यालय गाठले. अ‍ॅड. ठाकरे समर्थक संस्थेच्या कर्मवीरांचे फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले होते.

मविप्र संस्थेच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब क्षीरसागर, आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, रवींद्र पगार, भाऊसाहेब मोरे, तर सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, राजेंद्र डोखळे, भरत शिंदे, वसंत पवार यांनी अर्ज सादर केले. उपाध्यक्षपदासाठी विशाल सोनवणे, दिलीप दळवी, रवींद्र पगार, विश्वास मोरे, गौरव वाघ, डॉ. विलास बच्छाव, सभापतिपदासाठी माणिकराव बोरस्ते, बाळासाहेब क्षीरसागर, रवींद्र पगार, उपसभापतिपदासाठी राजेंद्र डोखळे, भाऊसाहेब मोरे, गौरव वाघ, रवींद्र पगार, विशाल सोनवणे, सुभाष देसले, डॉ. विलास बच्छाव यांनी अर्ज भरले. चिटणीसपदासाठी रवींद्र पगार, प्रसाद सोनवणे, विश्वास मोरे, गौरव वाघ, भाऊसाहेब मारे, विशाल सोनवणे, दिलीप दळवी, भरत शिंदे, डॉ. विलास बच्छाव यांनी अर्ज सादर केले. महिला सदस्य पदासाठी मनीषा आहेरराव, निर्मला खर्डे, नीलिमा आहेर, सोजाबाई पवार, शोभा मोरे, शालन सोनवणे, जयश्री बाजारे, प्रमिला कदम, सरला कापडणीस, ज्योती तासकर यांनी अर्ज भरले.
दरम्यान, तालुका संचालकपदासाठीही इच्छुकांनी अर्ज सादर केले.

नाशिक ग्रामीणमधून 6, मालेगावमधून 3, येवल्यातून 6, सिन्नरमधून 8, देवळ्यातून 6, दिंडोरी व पेठमधून 3, नाशिक शहर 4, निफाड 8, नांदगावमधून 1, सटाण्यातून 4, इगतपुरीतून 7, कळवण व सुरगाणातून 5, चांदवडमधून 7 इच्छुकांनी अर्ज निवड मंडळाला सादर केले. प्राथमिक-माध्यमिक सेवक संचालकपदासाठी 11, तर उच्च माध्यमिक-महाविद्यालयीन संचालकपदासाठी 2 अर्ज प्राप्त झाले.

मेळावा उत्साहात
मविप्र संस्थेसाठी अर्ज सादर केल्यानंतर अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा मेळावा धनदाई लॉन्स येथे पार पडला. यात अ‍ॅड. ठाकरे यांच्यासह आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीका करीत, यंदा परिवर्तन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी अ‍ॅड. ठाकरे समर्थक सभासद-मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन्ही पॅनलच्या प्रचारामुळे निवडणुकीत रंगत
मविप्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रगती आणि परिवर्तन या दोन्ही पॅनलच्या वतीने जिल्हाभरात मेळावे, बैठका आणि प्रचार रॅलींचे आयोजन केले जात आहे. त्यातच मंगळवारी (दि.9) परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी रॅली काढली. दुसरीकडे प्रगती पॅनलने जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आल्याचे पाहायला मिळाले. रॅली व मेळाव्यांमुळे जिल्हाभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. एखाद्या राजकीय निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीला महत्त्व आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :

The post मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.