महात्मा गांधी शहीद दिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण 

नाशिक :  २६ नोव्हेंबरपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता. ३०) संयुक्त किसान मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी उपोषण करण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी ३ कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा २०२० विरोधात, तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्यात यावा या व इतर मागण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे. २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीत लाल किल्यावर भाजप केंद्र सरकार पुरस्कृत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याचा निषेध करण्यासाठी व दिल्लीत  लढणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार शेतकरी आंदोलनला बदनाम करत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधीं शहीद दिनी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 

एकदिवसीय उपोषण आंदोलनात महात्मा गांधीना अभिवादन करण्यासाठी व शेतकरी आंदोलनला बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी  संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या वतीने राजू देसले, सुनील मालुसरे,  शरद आहेर, रंजन ठाकरे,डॉ डी एल कराड, अनिता पगारे, महादेव खुडे, व्ही डी धनवटे, विजय दराडे, विजय पाटील, नाना बच्छाव,किरण मोहिते, समाधान बागुल, आसिफ सर, शांताराम चव्हाण,धोत्रे प्रभाकर वायचळे बबलू खैरे नाझीम काझी, निशिकांत पगारे,  जगदीश पवार,भास्कर शिंदे, देविदास बोपळे, नामदेव बोराडे,पद्माकर इंगळे,  मधुकर मुठाल,राम निकम, डॉ शोभा बच्छाव, डॉ हेमलता पाटील,मुकुंद रानडे, तानाजी जायभावे,  कृष्णा शिंदे अपूर्व इंगळे, संतोष काकडे,  आदी उपस्थित होते