महानिर्मितीची रेकॉर्डब्रेक वीजनिर्मितीकडे वाटचाल; मागील सर्व उच्चांक मोडीत

एकलहरे (जि. नाशिक) : एकीकडे कोळसाटंचाई व विविध अडचणींचा सामना करीत असलेल्या महानिर्मितीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या मार्चमध्ये लॉकडाउनमुळे विजेची मागणी घसरली होती. यंदा मार्चमध्ये थर्मल मासिक वीजनिर्मिती करताना स्वतःच्या मागील मे २०१९ चा ४,८२६ मेगा युनिट या मासिक उच्चांकाला मागे टाकून १७७ मेगा युनिटनी वाढ करीत नवीन उच्चांक ५,००३ मेगा युनिटवर पोचला आहे. 

एकंदरीतच खासगी वीज कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहताना महानिर्मितीने आपले अस्तित्व वर्षभरात सिद्ध केले आहे. ही उच्चांकी निर्मिती करीत असताना महानिर्मितीचे अधिकारी, अभियंते, कामगार, कंत्राटी कामगारांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. कोविड काळात सर्व खबरदारी घेऊन सर्वांनी ही कामगिरी केली. कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी हे शिवधनुष्य पेलले आहे, असे महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. मार्च २१ आणि आर्थिक वर्ष २०-२१ साठी मासिक औष्णिक निर्मिती ५,००० आणि वार्षिक एकूण निर्मिती ५० हजार मेगा युनिटनी ओलांडली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

वीजनिर्मितीची आकडेवारी (मेगा युनिटमध्ये) 
औष्णिक : 
मासिक : ५००२.८८ 
वार्षिक : ४३८७९. ५३ 

जलविद्युत 
मासिक : ५०९.६११ 
वार्षिक : ४०३१.००७ 

वायू 
दैनिक : ६.६४० 
मासिक : १९९.३५१ 
वार्षिक : २००७.९६४ 

सौर 
मासिक : २६.९६४ 
वार्षिक : २६८.८४८ 

एकूण 
मासिक : ५७३८.८११ 
वार्षिक ; ५०१८७.३५६ 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी