‘महानिर्मिती’चे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्राची सेवा

एकलहरे (जि.नाशिक) : संपूर्ण देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना महानिर्मितीने वीजनिर्मितीचा आतापर्यंतचा उच्चांक गाठून महाराष्ट्राची सेवा चालविली आहे. मात्र आज ही सेवा करताना अधिकारी व कर्मचारी यांना अभिमान वाटत असला तरी वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांना अतोनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

‘महानिर्मिती’चे कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत 
भारतात एनटीपीसीनंतर वीजनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणारी सर्वांत मोठी कंपनी म्हणून महानिर्मितीचा नावलौकिक आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात वर्षाभरापासून कोरोनाने हाहाकार माजविला असताना जगभरातील अनेक देशांना टाळेबंदी करावी लागली. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला घरात सहजपणे वेळ घालविता यावा, यासाठी महानिर्मितीने सातत्याने वीजपुरवठा अखंड ठेवला. त्यानंतर मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री अनेकांनी मुक्तकंठाने महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं. या कौतुकाने भारावलेले अधिकारी व कर्मचारी आणखी जोशाने महानिर्मितीच्या सेवेसाठी सजग झालेत.

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास

आज मुळात महानिर्मिती आपल्या क्षमतेपेक्षा फक्त ७० टक्के मनुष्यबळावर काम करत आहे. राज्याला उजेडात ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाया कर्मचाऱ्यांचं आयुष्य मात्र पगाराविना अंधारात गेल्याचं चित्र आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता महानिर्मितीच्याच सिस्टर कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाला आहे. तसेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विजेसारखी अत्यावश्यक सेवा पुरवताना महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस युद्धपातळीवर मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे.  

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप