महानिर्मितीच्या इतिहासात सर्वाधिक वीजनिर्मित! औष्णिक वीजनिर्मितीमध्ये केला नवा विक्रम

एकलहरे (जि. नाशिक) : महाराष्ट्र राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करताना महानिर्मितीने नावाला साजेशी कामगिरी बजावत मंगळवारी (ता. ९) दुपारी एकूण १०,४४५ मेगावॉट वीजनिर्मिती करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये एक विक्रम केला आहे. महानिर्मितीच्या सुमारे ६० वर्षांतील सर्वोच्च वीजनिर्मितीचा हा नवा उच्चांक आहे. 

७ मार्चपासूनची कामगिरी अधिकाधिक उंचावत मंगळवारी सरस कामगिरी करत हा उच्चांक साध्य केला. यापूर्वीचा २० मे २०१९ चा १०,०९८ मेगावॉटचा उच्चांक मोडीत काढला. महानिर्मितीने आधी १०,२७५ मेगावॉट वीजनिर्मिती साध्य केली व त्यात सातत्य राखत मंगळवारी स्वतःचा विक्रम मोडून १०,४४५ मेगावॉट वीजनिर्मिती करत ऐतिहासिक कामगिरी केली. औष्णिक वीजनिर्मितीद्वारे ७,९९१ मेगावॉट, वायू वीजनिर्मिती केंद्राद्वारे २६४ मेगावॉट, तर जलविद्युत केंद्राद्वारे २,१३८ मेगावॉट आणि सौरऊर्जा प्रकल्पामधून ५० मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली. या वेळी महावितरणची विजेची मागणी २२,१२९ मेगावॉट होती, तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती १६,४२९ मेगावॉट इतकी होती. १०,००० पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. ८ मार्चला महानिर्मितीने १०,०९७ मेगावॉट वीजनिर्मिती साध्य केली होती. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

उन्हाळ्यामुळे राज्याची विजेची मागणी वाढत असून, त्याची पूर्तता करण्यासाठी सक्षम असल्याचे महानिर्मितीने सिद्ध केले आहे. विविध समस्यांवर यशस्वी मात करून आगामी काळात याच प्रकारे सातत्याने १०,००० मेगावॉट वीजनिर्मिती करून नवनवे उच्चांक करण्यास महानिर्मिती सज्ज आहे. हेच विक्रमी कामगिरीने दाखवून दिले आहे. 

ऊर्जामंत्र्यांकडून अभिनंदन 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोळसा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केलेले प्रयत्न व महानिर्मिती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या नेतृत्वाखाली महानिर्मितीने राबविलेल्या अनेक सुधारणांमुळे विक्रमी वीजनिर्मितीची कामगिरी साध्य झाली आहे. याबद्दल प्र. संचालक (संचलन) राजू बुरडे, संचालक (मायनिंग), पुरुषोत्तम जाधव, संचालक (वित्त), बाळासाहेब थिटे व प्र. कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी त्यांचे आभार मानले. यशाबद्दल सर्व कर्मचारी, कंत्राटी कामगार, अभियंते, तंत्रज्ञ, तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जामंत्री डॉ. राऊत व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक खंदारे यांनी पूर्ण महानिर्मितीचे विशेष अभिनंदन केले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO