महापालिका कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश; कर्मचारीवर्ग धास्तावला 

नाशिक : कोरोनाचे निमित्त करून घरी राहणे, बायोमेट्रिक बंद असल्याने रजिस्टरमध्ये नोंद करून मुख्यालयातून गायब होण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी सर्वच कर्मचाऱ्यांना नियमित कामकाजाच्या दिवसांबरोबरच सुटीच्या दिवशीदेखील कामावर हजर राहण्याचे आदेश काढल्याने कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेचे कामकाज सुरळीत चालण्याबरोबरच फील्डवरदेखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

महापालिका कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश
दोन महिन्यांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या मुळे महापालिकेकडील मनुष्यबळाची तूट समोर येत असताना अनेक कर्मचारी आजारी असणे, कोरोना लसीकरण आदींचे निमित्त करून दांडी मारत असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर आयुक्त जाधव यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देतानाच शनिवार, रविवार, तसेच अन्य सार्वजनिक सुटीच्या दिवशीदेखील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई

जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नियमित कामकाज करण्याबरोबरच फील्डवरदेखील कर्मचाऱ्यांना पाठविले जाणार आहे. जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करणे, कोरोनायोद्धा म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांची मदत करणे आदी कामे केली जाणार आहेत.