महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी; राजदुत सांभाळणार प्रचाराची धुरा

नाशिक : गेल्या पंचवार्षिक मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करूनही मतदारांनी मनसेला नाकारले असले तरी आगामी निवडणुकीसाठी मनसेने आतापासूनचं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात मनसेचे दोन वरिष्ठ नेते नाशिक मध्ये येवून राजदुत तयार करणार आहेत. या राजदुतांच्या माध्यमातून मनसेचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. मनसेला पुन्हा उभारी मिळण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकायांनी सज्ज राहण्याबरोबरचं पक्षात एकदिलाने राहण्याचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकायांच्या बैठकीत दिला. 

एक दिलाने राहण्याचा ठाकरेंचा सल्ला

विवाह सोहळ्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक मध्ये आज आले. जेष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम व मनसेचे नगरसेवक सलीम शेख या निवडक पदाधिकायांशी त्यांनी चर्चा केली. गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात मनसेच्या दुसया फळीतील पदाधिकायांनी राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेवून मनसेसाठी चांगले वातावरण व प्रदेश पातळीवरील नेते शहरात असताना सत्ताधारी भाजप विरोधातील नाराजी विरोधात आवाज उठविला जात नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. जानेवारी महिन्यात मी येतो असे आश्‍वासन घेवुन परतलेल्या पदाधिकायांना त्यानंतर महिनाभर वाट पाहावी लागली. त्यापार्श्‍वभूमीवर आजच्या आगमनानंतर राज ठाकरे काय भुमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. प्रमुख पदाधिकायांच्या बैठकीत त्यांनी एक दिलाने राहण्याचा सल्ला दिला. पुढील आठवड्यात मुंबईहून दोन वरिष्ठ नेते शहरात येतील त्यांच्याकडून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

राजदुत ठरणार महत्वाचे 

बुथप्रमुखांच्या धर्तीवर मनसेने राजदुत हि संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. राजदुत हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून प्रचार करणार आहे. पक्षाची ध्येय, धोरणे व महापालिकेत सत्ता काळात झालेली कामे लोकासंमोर मांडणार आहे. राजदुत संकल्पनेच्या माध्यमातून मनसे नाशिक मध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणार आहे. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा